Friday, April 1, 2011

वेल बावडी..


(एक वेल आणि वृक्ष)
ऐन ग्रीष्मात अचानक...
तो बहरून आला...
नव्या पालवीने
मन मोहरून गेला...

मी एक वेल बावडी...
तया बिलगण्या तरसली...
फुलांची माला लेऊन..
त्याच्या साठीच सजली...

धुंद त्या संध्याकाळी
मेघ भरुनी आले...
तृष्ण धरतीवरी..
मृद्गंध पसरुनी गेले..

रोमांचक त्या प्रसंगी..
वेल त्याला बिलगली...
गंड अर्पुनी तयाला..
कुशीत त्याच्या निजली..
महेश...